पंढरपूर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाला पाठिंबा देण्यासाठी नेमतवाडी येथील महिला बसल्या साखळी उपोषणाला.
चूल आणि मूल हे वाक्य मोडीत काढत आपल्या मुलं बाळाच्या भवितव्यासाठी महिला आज रस्त्यावरती उतरून उपोषण करत आहेत.
आपलं घरदार प्रपंचाचा विचार न करता मुलांच्या भवितव्यासाठी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय नेमतवाडी येथील महिलांनी घेतला.
दि.28/10/2023 पासून उपोषण चालू असून विशेष बाब म्हणजे महिलांनी यात लक्षणीय सहभाग नोंदवीला आहे व आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत न उठण्याचा निर्धार हि महिलांनी या वेळी केलेला आहे.