Type Here to Get Search Results !

व्हाईस आँफ मिडियाच्या ठाणे जिल्हा निरीक्षक पदी झुंजार पत्रकार मंगल डोंगरे यांची निवड !!



मुरबाड  ( प्रतिनिधी )  लक्ष्मण पवार 

 

पत्रकारिता क्षेत्रात  गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले, आणि विविध वर्तमान पत्रांमधुन आपल्या लेखनीतुन गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे दै.ठाणे वैभव,दै.श्रीसाम्राज्य,दै.बातमीदार आणि सा.सिद्धेश्वर वार्ताकिरणचे झुंजार पत्रकार श्री. मंगलजी डोंगरे, हे व्हाईस आँफ मिडिया, या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना, त्यांची संघटनात्मक कार्यकुशलता पाहून, त्यांना ठाणे जिल्ह्यात संघटनेची जोरदारपणे मोर्चे बांधणी करून शहरी भागासह ग्रामीण भागात तळागाळातील पत्रकारांना सहभागी करून  व्हाँइस आँफ मिडिया मध्ये सामिल करून घेण्यासाठी त्यांचे मोठे योगदान लाभणार असल्याने काल झालेल्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या मिटींगमध्ये  श्री.मंगल डोंगरे यांची ठाणे जिल्हा निरीक्षक पदी निवड करण्यात आली असुन,त्यांच्या कडे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. अरुणराव ठोंबरे यांनी मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, या तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला  आहे. यावेळी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष-अरुणराव ठोंबरे, जिल्हा महासचिव रामेश्वर गवई ,जिल्हा कार्याध्यक्ष-जाफरभाई वणु,जिल्हा संघटक-कमालभाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष-सुरेश जगताप, जिल्हा प्रवक्ते-अरूण बैकर,यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत..

       व्हाईस आँफ मिडिया हि देशातील "नंबर एक "ची राष्ट्रीय पत्रकार संघटना असुन, ति, फक्त पत्रकार आणि पत्रकारितेसाठीच लढत आहे. .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad