Type Here to Get Search Results !

यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन



यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन 


आंबेगाव वसाहत( घोडेगाव)

दि.२८/१०/२०२३

 यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे सहकार मंत्री श्री. दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विषय ज्ञान ,चालू घडामोडी, किडा, मनोरंजन , राजकारण या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता ५ वी ते १० मधील २९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली .

प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या प्रास्ताविकात उपक्रम विभाग प्रमुख वंदना मंडलिक यांनी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शैक्षणिक ,सामाजिक व राजकिय कार्याचा परिचय करून दिला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक एंजल मंगेश कुंभार, मनस्वी संतोष पिंगळे, दिक्षा विनायक घोडेकर आणि मोठ्या गटात प्रथम क्रमांक सोहम विनायक घोडेकर, ध्रुव सुरेश कापडणीस, आरोही रमेश काळोखे यांनी संपादन केले.

  या निमित्ताने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थिनींनी वाढदिवसानिमित्त बनविलेल्या शुभेच्छा पत्रांचे फलक अनावरण करण्यात आले. 

प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैभव गायकवाड , लक्ष्मी वाघ, गौरी विसावे ,निलम लोहकरे यांनी काम पाहिले व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नियोजन माणिक हुले, वैशाली काळे,संजय वळसे,राधिका शेटे, संतोष पिंगळे, लक्ष्मण फलके, सुभाष साबळे, गुलाब बांगर यांनी केले  

 विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी प्रश्नमंजुषा सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडत असून त्याचा समावेश दैनंदिन परीपाठात केल्याचे सांगितले . विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली .

प्रतीनीधी आकाश भालेराव

 घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad