Type Here to Get Search Results !

संस्कारीत मूल्य जपणे ही आपली खरी संपत्ती.



सप्त खंजरी वादक इंजि. उदयपाल

महाराज


कोरपना येथे सामाजिक प्रबोधन पर किर्तन


कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे


समाजात वाढत चाललेला व्यभिचार , व्यसनाधीनता यावर लगाम घालण्यासाठी नैतिक संस्कार उपयोगी मूल्यांच्या बिजाचे रोपण होणे आज खरे गरजेचे असल्याचे मत सप्तखजरी वादक इंजि. उदयपाल महाराज वणीकर यांनी कोरपना येथील तहसील मार्गावरील न्यू शारदा महिला मंडळ तर्फे रामनगर परिसरात

आयोजित सामाजिक प्रबोधनपर किर्तन प्रसंगी व्यक्त केले.

कीर्तनाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा , विदेही सद्गुरु संत जगन्नाथ बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक तुळशीराम डोहे , प्रमुख अतिथी म्हणून शंकर चिंतलवार, दादाजी तुराणकर,किसन तोडासे, अब्दुल वहाब शेख , सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी 

सेवानिवृत्त शिक्षिका शालिनी दुर्गे, संजीव चांदुरकर, गंगाधर गिरडकर, मिनाथ महाराज पेटकर, अरविंद अवथरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. पुढे कीर्तनात प्रबोधन करताना सप्त खजेरी वादक उदयपाल वणीकर यांनी मोबाईलचा वाढलेला गैरवापर , वाईट संगतीचा परिणाम , स्पर्धा परीक्षाचे महत्व आदी विषयावर भाष्य केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माजी नगरसेवक सुभाष तुरणकर , प्राचार्य संजय ठावरी यांच्या पुढाकारातून अनिल कवरासे, टेभूर्डे सर , विनोद मालेकार , ऋषी जोगी आदीसह रामनगर , शिवाजीनगर वासियांच्या सहकार्यातून झाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने किर्तन प्रेमींची उपस्थिती होती. कीर्तनाची सांगता राष्ट्रवंदनेने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies