Type Here to Get Search Results !

नागपूर दीक्षाभूमी येथे फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बाल विवाह रोखण्यास मार्गदर्शन.



फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य विश्वस्त किरण गायकवाड, विनोद गायकवाड, अजित गायकवाड, सोमनाथ गायकवाड, नितीन गायकवाड तसेच सर्व उपासक महिला , पुरुष दोन दिवस नागपूर येथे आयोजित धम्मचक्र परिवर्तन दिन या निमित्ताने गेले असता दीक्षाभूमी आणि जवळपास परिसरामध्ये आपल्या लोकांना स्वच्छतेचे महत्व पटऊन देऊन परिसरातील स्वच्छ्ता करण्यात आली. तसेच नागलोक परिसरामध्ये बाल विवाह रोखण्या संदर्भात शपत घेऊन त्या संदर्भात फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने जनजागृती करून पोलीस प्रशासन यांच्यावर गेली 4 ते 5 दिवस ताण असल्याने फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळीं फुले आंबेडकर प्रतिष्ठान चे किरण गायकवाड, विनोद गायकवाड, अजित गायकवाड, सोमनाथ गायकवाड, नितीन गायकवाड, संभाजी तडाखे, तसेच इतर सर्व सदस्य महिला उपासक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad