Type Here to Get Search Results !

आदिवासीचे आरक्षण, हक्क ,पेसा कायदा ,वाचण्यासाठी आदिवासी संघटना आणि समाजानी एकत्र येण्याची गरज अविनाश शिंदे



जव्हार :- सोमनाथ टोकरे 



 - दि -८ ऑकटोबर २०२३ रोजी वाडा तालुक्यातील आर्यन आदिवासी फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य गाळतरे ग्रामपंचायत मधील धुशाल पाडा समाज मंदिर येथे संस्थापक श्री कुंदन टोकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.

 आपली आदिवासी परंपरा कशी टिकवावी तसेच गेल्या चार पाच वर्षापासून आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही आदिवासी संघटना आदिवासीच्याअन्याय अत्याचार विरोधी आदिवासींचे हक्क मिळून देण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करत आहे . तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पेसा कायदाविषयी जन जागृती गावा मध्ये करावी.कुपोषण शिक्षण विधवा अपंग याविषयी सामाजिक सहकारी योजना कार्य करत आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासींच्या अन्याय अत्याचार विरोधी आदिवासींच्या सरकारच्या योजना सर्व पदाधिकाऱ्यांनी आदिवासी यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्या पदाधिकाऱ्यांनी काम करण्यासाठी आवाहन केले. या हेतूने येणाऱ्या नियोजन करण्यासाठी वाडा तालुका स्तरावर बैठक गाळतरे येथे आयोजित करण्यात आली होती.त्यानिमित्त वाडा तालुका अद्यक्ष साक्षी गागडे पदांच्या नियुक्ती करण्यात आली. आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची वारसा घेऊन आदिवासींचे महापुरुष आदिवासींची संस्कृती रूढी,परंपरा, आपले विविध पथनाट्य, तारपा नृत्य, ढोल नाच, तूर नाच,असे इतरही जास्तीत जास्त आदिवासींची संस्कृती जपत पथनाट्य आपली संस्कृती जपण्यासाठी कार्यकर्त्यांना पुढ आले पाहिजे. आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने , आदिवासींच्या योजना सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन आर्यन फाऊंडेशनचे संस्थापक कुंदन टोकरे तसेच अविनाश शिंदे आर्यन आदिवासी फाऊंडेशन वाडा तालुका अद्यक्ष यांनी पदाधिकाऱ्यांला करण्यात आले. मिटींग दरम्यान निमित्ताने उपस्थित आर्यन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ टोकरे, सचिव संदीप महाकाळ, खजिनदार राजकुमार डवले, पालघर उपजिल्हाप्रमुख कैलास घाटाळ, वसई तालुकाध्यक्ष गणेश पवार, वाडा उपतालुकाप्रमुख छगन टोकरे, मान्यवरांच्या उपस्थितीत पदे नियुक्ती करण्यात आली . जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad