Type Here to Get Search Results !

कंत्राटी व खासगीकरण विरोधात कोरपना तहसीलवर धडक मोर्चा



कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे


कोरपना - कंत्राटी व खासगीकरण विरोधात पुरोगामी विचार मंच तालुका कोरपना द्वारा

कोरपना येथील तहसील कार्यालयावर विशाल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.




कंत्राटी पद्धतीने पद भरती चा शासकीय जीआर रद्द करण्यात यावा, शिक्षण महसूल आरोग्य जिल्हा परिषद पंचायत समिती आदी शासकीय पद भरती कंत्राटी पद्धतीने भरतीचा काढलेला जीआर रद्द करण्यात यावा, राज्यातील बासस्ट हजार शाळांचे होणारे खासगीकरण रद्द करण्यात यावे, वीस पटसंख्येच्या आतील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, बेरोजगारांना दहा हजार रुपये प्रतिमाह बेरोजगार भत्ता देण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , सुपरवायझर रोजगार सेवक आरोग्य सेविका आदींना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शेत जमिनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावे आदी सह अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या.




या मोर्चा तालुक्यातील विविध संघटनांनी सहभाग नोंदवला होता. सदर मोर्चा कोरपना बस स्थानक पासून राजीव गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कातलाबोडी रस्ता मार्गे प्रशासकीय भवन परिसरातील तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आला.यावेळी मोर्चेकर्यानी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.




या मोर्चाला मोठ्या संख्येने कोरपना तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies