Type Here to Get Search Results !

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डी.एड बी.एड.टेट २०२२ नुसार पात्र उमेदवार यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी सुरूच



जव्हार :-सोमनाथ टोकरे 


पालघर जिल्ह्यात पेसा शिक्षक भरती प्रक्रिया चालू असून जिल्ह्यातील पेसा क्षेत्रासाठी एकूण १३१८ शिक्षक जागा भरती होत आहे. त्यापैकी ८५० शिक्षक पात्र झाले आहेत, तर उर्वरित ४६८ पदे हि अपात्र झाली आहेत. काही शैक्षणिक अटीमुळे जे शिक्षक अपात्र झाले आहेत,त्यांनाही शिक्षक भरतीत प्राधान्य देऊन नोकरीत सामावून घेतले पाहिजे, ज्यांची टेट परीक्षा गुणवत्ते यादी नुसार त्यांना पेसा शिक्षक भरतीमध्ये समावेश करून येणाऱ्या पाच वर्षांत त्या शिक्षकांनी टेट परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले पाहिजे,शासन पत्रकानुसार पेसा क्षेत्रातील सरळसेवा भरतीनुसार भरती करण्यात यावी. खाजगीकरणं प्रकिया रद्द झाली पाहिजे यासर्व मागण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डी.एड बी.एड.टेट २०२२नुसार पात्र उमेदवार यांचे आमरण उपोषण चोथ्या दिवशी सुरूच. असून पालघर जिल्ह्यातील शिक्षक उमेदवार पालघर जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या बाजूला उपोषणाला सोमवार दि.९ ऑक्टोबर पासून उपोषण ची सुरवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला जनजाती विकास मंच विवेक करमोडा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरवात केली असून आज उपोषण चा तिसरा दिवस असून सुद्धा अजून पर्यत जिल्हा परिषद पालघर प्रशासन कडून सदर मागण्या संदर्भात लेखी निर्णय दिलेला नाही त्यामुळे उपोषण सुरूच असून आज उपोषण च्या तिसरा दिवशी एका महिला उपोषण कर्त्याची तब्येत खालावल्या नंतर पोलीस यंत्रणा यांनी ताबडतोब जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवून उपोषण कर्त्या ची मेडिकल तपासणी करण्यासाठी टीम पाठविण्यात आली असुन तपासणी केली असून आज काही महिलांना चक्कर येऊन पडल्या आहेत.सदर उपोषण मध्ये जवळपास ४०० पेक्षा जास्त आदिवासी अपात्र ठरवलेले शिक्षक बांधव तसेच काही महिला वर्ग लहान मुलांना घेऊन उपोषण साठी बसले आहेत. सदर उपोषण स्थळी काल पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भेट देऊन लवकरात लवकर आपल्या मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांना भेटून पालघर जिल्ह्यातील उर्वरित रिक्त जागांवर अपात्र शिक्षक यांना संधी देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करून आपला निर्णय मार्गी लावू असे आश्वासन दिले, आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी भेट देऊन उपोषण कर्ते यांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत.तसेच सदर उपोषणस्थळी पहिल्या दिवसापासून आदिवासी एकता परिषद अध्यक्ष काळूराम काका धोदडे, डॉ.सुनील पराड यांनी पाठींबा दिला आहे. त्याचबरोबर जनजाती विकास मंच, आर्यन आदिवासी फाऊंडेशन, युवा आदिवासी संघ ,प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार तालूका, तसेच विविध आदिवासी संघटना चे पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून पाठींबा दर्शवून सहकार्य करीत आहेत.जो पर्यत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यत आमचं उपोषण सुरू राहील असे उपोषणकर्ते कैलास खुरकुटे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad