Type Here to Get Search Results !

केशवसृष्टी ग्राम विकास योजना, अंतर्गत विध्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न



जव्हार :-सोमनाथ टोकरे .






         आज दि.१३/१०/२०२३ शुक्रवार रोजी जव्हार सदानंद, दर्गा आळी येथे सकाळी ११ वाजता केशव सृष्टी ग्राम विकास योजना अंतर्गत वात्सल्य ट्रस्ट मुंबई; मार्फत विध्यार्थ्याना संगणक प्रमाण पत्र वितरणाचा समारंभ जव्हार केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले व सर्व मान्यवरांची स्वागत करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली केशव सृष्टी ग्राम विकास योजना अंतर्गत वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या सहयोगाने जव्हार केंद्रात विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण सण - २०२३ जानेवारी सुरू करण्यात आले असून जव्हार डोंगरी ग्रामीण भागातील गोर-गरीब आणी गरजू विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा पुढील आयुष्या मध्ये संगणक प्रशिक्षणाचा खूप फायदा होणार आहे तसेच विद्यार्थ्यां मध्ये देखील खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. या प्रशिक्षणा मध्ये सहा प्रकारचे कोर्सेस सुरु असुन आता पर्यंत ६५ विद्यार्थ्यांनी लाभ चांगल्या प्रकारे घेतला आहेत. लाभार्थी विध्यार्थ्याना संगणक प्रमाण पत्र वितरणाचा समारंभ जव्हार केंद्रात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या जव्हार पंचायत समितीचे सभापती विजया ताई लहारे यांच्या शुभ हस्ते संगणक प्रमाण पत्र वितरित करण्यात आले. व सर्व विद्यार्थ्यांना मोलचे करियर मार्गरदर्शन हे सर्व मान्यवारांनी केले. व सर्वांंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून या प्रसंगी जव्हार पंचायत समितीचे सभापती विजया लहारे, आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस (भा.ज.पा) चे दयानंद लहारे, जव्हार केन्द्रातील पालक प्रमिलाताई कोकड, शिक्षण प्रमुख सुनिता बेलदार, संगणक शिक्षिका नीलम गरेल, विस्तारक राहुल खोटरा आणि पत्रकार प्रमोद मौळे, सर्व विध्यार्थी हे उपस्थित होते. या योजना, अंतर्गत विध्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रमाचे सर्व सूत्र संचालणं हे शिक्षण प्रमुख सुनिता बेलदार यांनी केले असून व त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad