Type Here to Get Search Results !

जव्हार | शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसैनी चिस्ती (र .अ .) शाही ऊरसाची आज पासून सुरवात.



 दिनांक ५ ऑक्टोंबर    २०२३ गुरुवार पासून सुरुवात होणार आहे .

दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक शाही उरूस रूढी वंशपरंपरागत यावर्षी देखील होणार आहे ....

या शाही ऊरसाची परंपरा बघितली तर पहिला दिवस ५-१०-२०२३ रोजी संध्याकाळी मगरीब नमाज नंतर जामा मस्जिद मधून फातिहा खानी होऊन पाचबत्ती ,ते अर्बन बँक चौक, सदरोद्दीन बाबा दर्ग्यावर फातिहा देऊन समाप्ती होणार ....

त्यानंतर रात्रीची नमाज नंतर सैय्यद मोहम्मद नूरमिया अशरफी यांची शानदार तकरीर होऊन पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न ..

 दुसरा दिवस  ६-१०-२०२३ शुक्रवारी नमाज नंतर ३ वाजता जामा मस्जिद पासून चादरची सुरवात होणार

भव्य मिरवणूक पाचबत्ती ते ,अर्बन बँक , गांधी चौक , अंबिका चौक ,पोलीस लाईन , ते राम मंदिर समोरून दर्ग्यावर चादर चढून मुस्लिम समाजातर्फे मौलाना फातिया खाणी करून  समाप्त करतात ...

  त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजेपासून सर्व समाज बांधवांसाठी व  भाविकांसाठी भंडाराचे आयोजन केले जाते ...

 या भंडारामध्ये नेते पुढारी अधिकारी वर्ग तसेच सामान्य व गरीब अश्या प्रकारे सर्व जाती धर्माचे भाविक एका लाईनीत बसून जेवन्याचा स्वाद घेतात....

 त्या दिवशी रात्री १० वाजेपासून टी . व्ही. स्टार .जुनेद सुलतानी व टी .व्ही. स्टार .गुलाम वारीस. या कव्वाला मध्ये   कव्वालीचा जंगी सामना पाहायला मिळेल ....

उरसाचा तिसरा दिवस संध्याकाळी रुढी - वंश परंपरागत जव्हार सदरोद्दिन बाबा दर्गाचे मुजावर यांच्या घरून संदलची सुरुवात होऊन ...

जुना राजवाडा येथे महाराज महेंद्रसिंग दिग्विजय सिंग मुकणे  यांच्याबरोबर ख्वाजा पीर छलाव्यावर वंशपरंपरागत संदल लावून व महाराजांच्या हस्ते ख्वाजा पीर केसरी रंगाचा ध्वजारोहनाचा कार्यक्रम करून दिल्ली ,अजमेर , वरून येणारे फकीरांचे घोषणा झाल्यावर भाविकांचे हस्ते चादर चढवणे असा कार्यक्रम संपन्न होतो.......

 त्यानंतर रात्री नातखा जुनेद बरकाती  यांचा कार्यक्रम होणार ....

 ५७१ वर्षापासून रुढी व वंश परंपरागत जव्हार शाही उरूस दरवर्षी केला जातो ...

 उरूस कमिटीचे या वर्षाचे अध्यक्ष अय्युब पठाण आहे ...

या शाही उरसाची खासियत अशी आहे की सर्वधर्म समावेशक सामाजिक सलोख्याचा संदेश देत असतो....


जव्हार :-सोमनाथ टोकरे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad