Type Here to Get Search Results !

कोरपना | कडोली सरपंचाची कर्तव्यात कसूर ग्रामस्थांकडून कारवाई करण्याची मागणी



दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ११ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते

तरी या ग्रामसभेसाठी सरपंच व काही सदस्य उपस्थित नव्हते सदर माहिती घेतली असता आज होणारी ग्रामसभा रद्द झाल्याची माहिती गावकऱ्यांना गावातील मंदिराच्या स्पीकर वरती अलाउन्समेंट करून ग्रामसभा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली.




कोणतीही नोटीस नाही पत्र नाही ऐन वेळेवर ग्रामसभा रद्द केल्यामुळे गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून ग्रामसभा लावली जाते सरपंच आपल्या मर्जीने ग्रामसभा रद्द करत असेल तर अशा दोषी व्यक्तीवर कारवाई का करू नये याकरिता समस्त ग्रामस्थांनी सरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता पंचायत समिती कोरपना या ठिकाणी नागरिकांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले सदर या प्रकरणाचे सविस्तर चौकशी करून संबंधित व्यक्तीवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी कडोली ग्रामस्थांनी केली आहे तेव्हा वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतील याकडे समस्त ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे 


९१ इंडिया न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोज गोरे कोरपना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies