Type Here to Get Search Results !

स्कॉर्पिओतून विदेशी दारुची वाहतूक एकास अटक



राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी यावली ( ता. मोहोळ) परिसरात स्कॉर्पिओमधून वाहतूक होणारी देशी-विदेशी दारु पकडली. महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. MH-45-AD-5826) मधून मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 90 मिली क्षमतेच्या 70 सीलबंद बाटल्या व ब्रँडीच्या 70 बाटल्या अशी अकरा हजार सहाशे किंमतीची विदेशी दारु वाहतूक करतांना पकडली. वाहनचालक किशोर सावता माळी (वय 34 वर्षे) या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad