Type Here to Get Search Results !

पटवर्धन कुरोली येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन



बाप भिक मागु देईना आणी आई जेवु घालीना आशी अवस्था राज्यातील शेतकर्याची झाली आहे. सोलापूर जिल्हात या वर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील उभी पीके हातची जातात की काय आशी परस्थिती निर्माण झाली होती. भिमा नदीचे पात्र काही महिने कोरडे पडले होते. सोलापूर, पंढरपूर, सांगोल्यासह नदी काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून उजणी धरणातून पिण्यासाठी नदीमधे पाणी सोडले गेले. दरम्यान वरुन राजाने गौरी गणपती च्या आगमना बरोबरच हजरी लावली. उजणीतुन पिण्यासाठी सोडलेले पाणी बंद केले. याच दरम्यान भिमा नदी वरील कोल्हापूर पधतीचे सर्वच बंधारे निडल टाकून दोन मीटरणे भरपूर घेण्याच्या सुचणा भिमा पाटबंधारे विभागाने संबधित विभागाला दिल्या गेल्या. कमी आधीक प्रमाणात पाऊस पडल्याने भिमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहते आहे. बरेच बंधारे दोन मीटरने भरून ही घेण्यात आले. परंतु पटवर्धन कुरोली, पीराची कुरोली बंधारा दीड मीटर ने पाणी आडवण्यात आले. कमी प्रमाणात पाणी आडवल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लक्षात आले. याचा जाब विचारण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते गेले त्यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली. की पटवर्धन कुरोली बंधारा दोन मीटरने भरून घेण्यासाठी निडलच उपलब्ध नाहीत. कारण या बंधार् याची तीनशे दारे दोन वेळेस या ठिकाणाहून इतर ठिकाणी पाणी आडव्या साठी नेली आहेत. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकारणी सदस्य कांतीलाल नाईकनवरे यांनी निवेदनाद्वारे चार पाच दिवसात ज्यांना .निडल दिली आहेत त्यांच्या कडून परत आणुन बंधारा अडीच मीटरने भरून नाही दिला तर बोबांबोब आदोलंन करण्यात येईल आसा इशारा दिला आहे. तसेच माढा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांना सिना जोड कालव्या प्रमाने विषय लक्ष देवुन पटवर्धन कुरोली बंधारा पुर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी केली आहे.




पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरील दारे बसवून घेण्यासाठी आज पंढरपूर येथे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी पटवर्धन करून चे कर्तव्यदक्ष सरपंच विष्णू बाबुराव मोरे ( पटवर्धन कुरवली च्या इतिहासात पहिल्यांदाच गावासाठी झटणारे सरपंच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना व स्वाभिमानी शेतकरी ला संघटनेला नेहमी सहकार्य करणारे)स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य कांतीलाल भाऊ नाईक नवरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केशव पाटील व दशरथ जवळेकर हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad