Type Here to Get Search Results !

कचरा मुक्त भारत अभियानांतर्गत जव्हार तालुक्याच्या व शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम



जव्हार :-सोमनाथ टोकरे 


जव्हार,दि १ ऑक्टोंबर रोजी 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

 यांच्या राष्ट्रव्यापी स्वच्छता अभियाना अंतर्गत कचरा मुक्त भारत या संकल्पनेतून आज दिनांक १ ऑक्टोंबर २०२३ रोजी जव्हार तालुक्यात व शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्वच्छ आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी पूर्ण निष्ठेने आपला परिसर, कार्यालय व सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा तसेच स्वच्छतेची आवड अधिक अधिक निर्माण करण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार आज सकाळी विविध शाळा, संस्था शासकीय कार्यालयातील कर्मचारी हे सर्व एकत्र येऊन हातात खराटा, फावडा, टिकाव घमेले व पंजा घेऊन आपापल्या कार्यालयाचा परिसरात स्वच्छता केली. सकाळी ८ वाजल्यापासूनच जव्हारचे पर्यटन स्थळ असलेल्या हनुमान पॉईंट या ठिकाणी श्री गजानन महाराज नर्सिंग कॉलेज अँड रिसर्च सेंटरच्या १२० विद्यार्थिनींनी हातात खराटा घेऊन परिसराची सफाई केली या परीसरात मोठ्या प्रमाणावर विविध खाऊची रिकामी पॉकीटे, आईस्क्रीमचे रिकामे कप, मक्याचा कचरा असा प्रचंड प्रमाणात पर्यटकांनी केलेला कचरा या विद्यार्थ्यांनी गोळा करुन हा परिसर स्वच्छ केला, तर महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जव्हारच्या श्री सदस्यांनी राजे यशवंतराव मुकणे चौकाची स्वच्छता केली. या अभियानांतर्गत शाळा, कॉलेज विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था ,तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कर्मचारी व सदस्य या सर्वांनी आपापल्या परिसरातील कचरा , रस्त्यावर वाढलेले गवत काढून परीसर स्वच्छ केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad