Type Here to Get Search Results !

परसोडा चुनखड्डी जमीन भुसंपादनाचा घोळ ? दलाल मार्फत जमीन व्यवहार अन्नत्याग.आंदोलन

  


         कोरपना तालुका प्रतिनिधी मनोज गोरे


    चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या टोकावर असलेल्या कोरपणा तालुक्याच्या सीमेवर आरसीसीपीएल सिमेंट कंपनी मुकुटबन यांनी परसोळा येथील 756.14 हेक्टर जमीन भूसंपादनासाठी प्रस्तावित केली आहे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये दलाला मार्फत मातीमोल दरामध्ये जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार हाताळले यापूर्वी जनसुनावणी मध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप असताना आक्षेपाची नोंद न घेता पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीच्या सोयीनुसार अहवाल तयार करून रान मोकळे केले मात्र नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष असून थेट शेतकऱ्यांशी संवाद करून जमिनी खरेदी करावे अशी मागणी गावकऱ्यांची आहे मात्र असे असताना कंपनीने काही दलाला मार्फत जमिनी खरेदी विक्री व्यवहार हाताळले तसेच काही शेतकऱ्यांना हाताशी धरून आपल्या मर्जीने दर ठरवून बारा लाखापासून 30 लाखापर्यंत प्रति एकर या दराने जमिनी खरेदी केल्या मात्र यामध्ये देखील घोळ असून शासनाचा महसूल कंपनीने बुडवलेला आहे प्रत्यक्षात प्रकल्प बाधित शेतकरी कुटुंबांना नोकरी मिळावी व सरसकट सर्व शेतकऱ्यांना एकच दर द्यावा ही मागणी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ठरले मात्र कंपनीने नेहमी दिलेल्या शब्द वर घुमजावभूमिका घेतवेळ काढू धोरण अवलंबिले आहे यामुळेभूमिपुत्रांची अवैलना करण्याचा प्रकार असून ज्या खनिजाच्या भरोशावर उद्योग चालणार आहे त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कंपनी कंपनी दिशाभूल करीत असून या अन्याय सहन करणार नाही असे म्हणत नेमीचंदयांनीआमरण उपोषण दिनांक 16 पासून सुरू केले आज आज उपोषणाला चौथा दिवस आहे तोपर्यंत रास्त मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन हटणार नाही अशी भूमिका आंदोलन करते व गावकऱ्यांनी घेतलेली आहे कंपनीने प्रथमच हात जिल्हा प्रदूषण व पर्यावरणामुळे होरपळून निघाला असून अनेक आजाराने जिल्ह्यात नागरिक त्रस्त आहेत कोरपणा भागामध्ये वाढता सिमेंट उद्योग हा आरोग्यासाठी घातक असून पर्यावरणाच्या अ संतुलनामुळे याचे परिणामआरोग्य शेती उत्पादन व भूगर्भातील पाणी पातळीवर झालेला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावा जमिनीचा योग्य दर मिळावा कंपनीने मालवाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी स्थानिकांना काम रोजगार द्यावा .सी एस आर फंडातूनविकासात्मक कामे करावी काम करावी इत्यादीमागणीसाठीउपोषणाला सुरुवात झाली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. प्रकाश खनके यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन समर्थन दिले यावेळी मोबीन बेग,अनिल राऊतश्रीनिवास आकमवर, प्रशंत कोगलवार, श्रिणू बलकी,राजू गोरे, बागेस मते,कुडलिक पावडे,गणेश चांदसूर्य, पिसाराम सिडाम, रामलाल मादेवार, डॉ. हुलके सह अनेक नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies