Type Here to Get Search Results !

कोरपना | परसोळा आमरण उपोषणाला आमदार सुभाष धोटे यांची भेट



कोरपणा तालुक्यातील सुरू असलेल्या आरसीसीपीएल कंपनीच्या विरोधात परसोडा ग्रामवासियांनी उपोषण सुरू केले आहेत त्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी भेट दिली यावेळी कोरपणा येथील तहसीलदार तसेच ठाणेदार साहेब व गावातील नागरिक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष उत्तमरावजी पेचे सीडीसीसी बँकेचे संचालक विजयराव बावणे  काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आरसीसीपीएल कंपनीचे महेश्वरी रेडी तसेच उपोषण करते यांच्यासोबत आमदार धोटे यांनी चर्चा केली सदर परसोळा बस स्टॉप परसोळा गावात जाणारा मुख्य मार्ग या कंपनीच्या वाहतुकीमुळे खराब झालेला आहेत तेव्हा तो रस्ता तात्काळ बनवून देण्यात यावा याकरिता ग्रामस्थांनी उपोषण केले आमदार साहेबांनी गावकऱ्याशी व कंपनीच्या अधिकाऱ्याची मध्यस्थी करून या मुख्य मार्गाचा समस्या सोडवण्यात आली सदर एक सप्टेंबर पासून हा रस्ता दुरुस्त करून देण्याचे कंपनीने मान्य केले तसेच या कंपनीत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या शेतकऱ्यांनी बऱ्याच जमिनी कंपनीला विक्री केलेले आहेत तसेच काही शेतकरी अजूनही कंपनीच्या अधिकाऱ्याची चर्चा करून जमिनीच्या खरेदी विक्री करीत आहेत त्यात जमिनीच्या खरेदी विक्रीचा अधिकार त्या शेतकऱ्यान्या असल्याने त्यांनी त्या अधिकाऱ्याची आपल्या जमिनीचा दर ठरवून विक्री करीत आहेत व त्या कंपनीला परवडेल त्या दरांमध्ये कंपनी जमिनी  खरेदी करीत आहे ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ आरसीसीपीएल कंपनी मार्गी लावण्याचे  आश्वासन दिले आहे राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी अखेर परसोळा येथील उपोषणाला भेट देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यात आमदार सुभाष धोटे यांना यश आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies