Type Here to Get Search Results !

ट्रॅफिक वॉर्डन ह्यांचे मानधनामध्ये 12000/- रुपयांपर्यंत वाढ करावी व विमा संरक्षण देण्याची मागणी



 डोंबिवली (भानुदास गायकवाड)

  ```कल्याण डोंबिवली महानरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात रोजच्या रोज वाहतुकीच्या समस्या वाढत असून, वाहतूक कोंडी, होणारे अपघात वाहतूक नियमन, होणारे अपघात, खड्डेमय रस्ते,वाहतुकीच्या निवाऱ्याचा अभाव धुळ धूर या मुले हवा वायू प्रदूषण, वाहन वाहक यावर करावी लागणारी कार्यवाही,विभागातील अपुरे संख्याबळ,कामाच्या तासाचा अनियमितपणा ,अश्या सर्व अडचणींना सामोरे जात वाहतूक नियमन करण्याबाबत वाहतूक पोलिसांनवर ताण वाढत चाल्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी व सहाय्यकची भूमिका बजावण्यासाठी वाहतूक विभागाला वेळोवेळी ट्रॅफिक वॉर्डनची गरज भासत असते, वाहतूक विभागाच्या आवश्यकतेनुसार महानगर पालिकेकडून ट्रॅफिक वॉर्डन पुरवले जातात व ट्रॅफिक पोलिसानं बरोबर काम करताना त्यांनाही वरील समस्यांना तोंड द्यावे लागतात, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ही वाऱ्यावर सोडलं जातो त्यांना कुटलही विमाकवच नसल्यामुळे व त्याना असलेल्या तुटपुंज्या मंजे ६००० मानधन असल्या मुळे त्यावर घर चालवणे कठीण होते, व त्यामुळे ट्रॅफिक वॉर्डन मिळणे मुश्किल होऊन जाते व सर्व भार ट्रॅफिक पोलिसांवर येऊन जातो तरी या सर्व गोष्टींचा सर्व विचारकरून त्यांचा मानधन १२००० करावा , व विम्याच संरक्षण देण्यात यावे या साठी मा. ॲड. जितेंद्र जयंत जोशी यांनच्या मार्फत कल्याण, डोंबिवली टिटवाळा,कोळसेवाडी वाहतूक विभागाला पत्र पाठवून मागणी करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies