Type Here to Get Search Results !

वावर आश्रमशाळा येथील गारुडकर सर व निकुंभ सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न



जव्हार : सोमनाथ टोकरे 


  जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेली वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये रयत शिक्षण संस्थेची प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी या शाळेचे सर्वांचे लाडके मुख्याध्यापक अरुण दगडू गारुडकर सर आणि प्राथमिक शिक्षक सुनिल पांडुरंग निकुंभ सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला.

आश्रमशाळा शिक्षक म्हटला की ९ ते ५ अशी वेळ पाळणारे शिक्षक  दिसतात ,पण  गारूडकर सर हे त्याहून अगदी वेगळे होते गेले १३ वर्ष त्यांनी विद्यार्थी सर्वागीण विकास व गुणवत्ता,क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांचे यश शाळेचे भौतिक सुविधा ,सांस्कृतिक कार्यक्रम ,सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक ग्रामस्थांच्या मनात घर केले होते यांची पहिली नियुक्ती ही अधिक्षक या पदावर करण्यात आली होती व २ वर्ष कामकाज बघितले नंतर गारुडकर सरांचा प्रमोशन होऊन २०१४ साली वावर शाळेवर मुख्खाध्यापक या पदावर आले असून यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार  प्रदान करण्यात आला आहे.तसेच निकुंभ सर हे १९९५ साली त्यांची चांभारशेत या शाळेवर नियुक्ती  करण्यात आली असून २००३ पासून ते २०११ पर्यंत त्यांनी प्राथमिक मुख्खाध्यापक यांचे काम सुद्धा केले आहे व या दोन्ही सेवापुर्ती शिक्षकांनी जाता जाता वावर आश्रमशाळेला निकुंभ सर यांनी दहा हजारांची व गारुडकर सर यांनी एकवीस हजाराची देणगीच्या स्वरूपात आर्थिक मदत केली .तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे राठोड सर यांनी केले.

या प्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तावडे साहेब,प्रकल्प प्रमुख आश्रमशाळा विभाग मोखाडा एल डी भोर साहेब ,सहा प्रकल्प अधिकारी रयत शिक्षण संस्था आश्रमशाळा विभाग मोखाडा ए एल शेळके साहेब,रयत सेवक को आप बँक संचालक भोये साहेब,स्कूल कमिटी यशवंत बुधर साहेब ,सरपंच विनोद बुधर, व पंचायत समिती सदस्य ज्योती बुधर,या शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक साळुंके सर या शाळेचे सर्व शिक्षक तसेच रयत शिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या शाळेवरून आलेले शिक्षक व विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad