Type Here to Get Search Results !

मोहोळ | दुष्काळावर मात करत बैरागवाडी येथील शेतकऱ्यांनी घेतले खरबुजा मध्ये विक्रमी उत्पादन



मोहोळ तालुक्यातील बैरागवाडी येथील शेतकरी समाधान तनपुरे यांनी घेतले खरबूज पिकांमधून विक्रमी उत्पादन,सव्वा एकर शेती मधून १६ ते २० टन खरबुजाचे उत्पादन मिळणार आहे यामधून त्यांना अंदाजे ९ ते १० लाख रुपये उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.




दिल्ली येथील व्यापाऱ्यांना जागेवरती 51 रुपये किलो दराने खरबुजाची खरेदी केली असून खर्च वजा जाता त्यांना निव्वळ नफा ७ ते ८ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे




सेंद्रिय शेती वर जास्त भर देऊन गरजेपुरतचं केमिकलचा वापर करून शेतकऱ्याने दुष्काळ परिस्थितीवर मात करत घेतले खरबुजा मधून भरघोस उत्पादन हे उत्पादन घेण्यासाठी त्यांना साधारणपणे १ ते १.५ लाखापर्यंत खर्च आला असून खर्च वजा जाता त्यांना ७ ते ८ लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे 


यावेळी शेतकरी समाधान तनपुरे म्हणाले यासाठी ग्रीन इंडियाचे प्रतिनिधी.सिद्धेश्वर माने आष्टी यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेता आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad