Type Here to Get Search Results !

डोंबिवली | वाहतूक शाखेकडून १०००० पेक्षा जास्त चलन असणाऱ्या प्रवाशी वाहनावर ( रिक्षांवर ) कठोर कारवाईचे आदेश



डोंबिवली ( भानुदास गायकवाड)

                        

डोंबिवली पुर्व - पश्चिमेला ई चलन डिव्हाईस व्दारे तसेच सीसीटिव्ही कॅमेरे व्दारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर डोंबिवली वाहतूक विभागाकडून नियमितपणे दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु, काही रिक्षा चालक हे त्यांचेवर वारंवार दंडात्मक कारवाई होऊन सुद्धा पुन्हा पुन्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात व प्रलंबित ई चलन दंड भरण्यास टाळाटाळ करीत असतात. ज्या रिक्षा चालकांचे वाहणावर 10,000/- रूपयांपेक्षा जास्त दंड प्रलंबित आहे अशा रिक्षा चालकांचे परमिट , बॅच नूतनीकरण व रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत मा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांना अहवाल पाठविण्यात आला असून या रिक्षाचालकानी तात्काळ डोंबिवली वाहतूक उपविभाग येथे संपर्क करून दंड भरावा अन्यथा वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांचेकडून संयुक्तपणे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या रिक्षा चालकाचे वाहन क्रमांक, त्यावरील प्रलंबित दंड डोंबिवली रेल्वे स्टेशन पूर्वेला (एकुण -44 रिक्षा क्रमांक) व पश्चिमेला (25 रिक्षा क्रमांक )असे विविध चौकात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.




     डोंबिवली वाहतूक विभागाकडून सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांचे वाहनावरील प्रलंबित दंड तात्काळ नजिकच्या वाहतूक शाखेमध्ये अथवा वाहतूक पोलिसांकडे भरावा अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies