आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला असून या टीमचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. यात रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशांत किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव या खेळाडूंचा समावेश असणार आहे.