Type Here to Get Search Results !

इनरव्हील क्लब ऑफ मंचर च्या वतीने विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी .



यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे इनरव्हील क्लब ऑफ मंचर च्या वतीने विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी .

आंबेगाव वसाहत

दिनांक 4/9/2023

यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे इनरव्हील क्लब ऑफ मंचरच्या वतीने मुलींची हिमोग्लोबिन व सिरम कॅल्शियमचे तपासणी शिबिर पार पडले .




विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या 130 विद्यार्थीनींच्या हिमोग्लोबीन तपासणी अंतर्गत लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट,न्यूट्रोफिल्स ,

 बेसोफील्स , ईओसिनोफिल्स यांची संपूर्ण रक्त तपासणी करण्यात आली .

इनरव्हील क्लबच्या चेअरमन डॉक्टर मेधा गाडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींना रक्त तपासणी रिपोर्टचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थिनींना लोहयुक्त व कॅल्शियम युक्त आहार व संतुलित आहार याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले . रक्त घटकांचे प्रमाण कमी असणाऱ्या विद्यार्थिनींच्या योग्य औषध उपचाराचे व पुन्हा तीन महिन्यानंतर त्यांचे रक्त तपासणी करण्याची जबाबदारी इनरव्हील क्लब घेत असल्याची माहिती त्यांनी दिली .

डॉ .सुवर्णा काळे यांनी सर्व मुलींचे रक्त तपासणी केली. विद्यालयातील शिक्षिका माणिक हुले ,वैशाली काळे , वंदना मंडलिक, राधिका शेटे, नीलम लोहकरे, गौरी विसावे यांनी रक्त तपासणी शिबिराचे नियोजन उत्कृष्टरित्या केले .


प्रतिनिधी - आकाश भालेराव

घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad