मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण गणेश विसर्जन दिवशी येत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने विनंती केलेवरून सदर ईद ए मिलाद सणाची मिरवणुक दिनांक-29/09/2023 रोजी आयोजीत केली असले बाबत.
आज दिनांक -05/09/2023 रोजी सायं.16.00 वा. ईद-ए-मिलाद या मुस्लिम बांधवांचे सणाचे अनुषंगाने मंचर शहरातील मुस्लिम बांधवांची मंचर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री.बलवंत मांडगे,मंचर पोलीस स्टेशन यांनी मिटिंग घेतली.ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सणाची मिरवणुक दिनांक -28/09/2023 रोजी येत असल्याने तसेच त्याच दिवशी हिंदु बांधवांचा गणश उत्सवाचा शेवटचा दिवस गणेश विसर्जन मिरवणुका असल्याने सदर मिटिंग मध्ये पो.नि.बलवंत मांडगे यांनी दोन्ही समाजाचे सण एकाच दिवशी येत असल्याने आपण ईद-ए-मिलाद सणाची मिरवणुक दिनांक-29/09/2023 रोजी घेवुन पोलीस प्रशासनास मदत करावी अशी विनंती केलेवरून सदर मिटिंग मध्ये उपस्थित असलेले सुन्नी मुस्लिम समाजाचे चेअरमन-हाजी मन्सुरखान पठाण,नाजीमभाई ईनामदार,खालीद ईनामदार,रियाज जमादार,इसरार खान व पदाधिकारी तसेच इतर यांनी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देवुन सदरची ईद ए मिलाद सण आंम्ही दिनांक -29/06/2023 रोजी घेत असल्याचे सांगितले.तसेच शिया मुस्लिम समाजाची दिनांक-23/09/2023 रोजी होणारी अमारी जुलुस मिरवणुक दिनांक -16/09/2023 रोजी ठेवुन चेअरमन -रहेबरअली मीर ,राजु ईनामदार,अल्लु इनामदार,अल्सर ईनामदार इतर मुस्लिम समाजाचे लोक यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य केल्यामुळे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी सर्व मुस्लिम समाजाचे मनापासुन आभार मानले.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर