जव्हार :-सोमनाथ टोकरे
सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने जव्हार तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत मधील गणेशउत्सव मित्र मंडळ मोख्या चापाडा गावात गेली कित्येक 50 वर्षांपासून एक गाव एक गणपती उत्सव परंपरा कायम जोपासली जात असून गणेशोत्सव निमित्ताने दरवर्षी प्रमाणे विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गावाच्या विकासासाठी गावातील नागरिकांचा लोकसहभाग खूप महत्त्वाचं आहे.त्यामुळे लोकसहभाग टिकून राहण्यासाठी सार्वजनिक गणेशोस्तव निमित्ताने मोख्या चापाडा गणेश मित्र मंडळ मोख्या चापाडा गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये लहान मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धां घेण्यात
संगीत खुर्ची, गाढवाला शेपूट लावणे,मेणबत्ती पेटविणे,धावणे, पोटा उडी,उकृष्ठ महिलेची व लहान मुलांसाठी निवड करून त्यांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यासाठी सायंकाळी जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सायंकाळी गावातील सर्व कुटुंबातील महिलांनी चूल न पटवता गणेशउत्सव मित्र मंडळ मोख्या चापाडा गणेशोत्सव मंडळ कडून सर्व गावातील कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन शेवटच्या दिवशी स्नेह भोजन महाप्रसाद म्हणून भांडार गाव जेवण करण्यात आले व यामध्ये लोणचा , पापड, फूलावं भात,पुरी असे अनेक पदार्थ जेवनात दिले या सर्व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजनासाठी मित्र मंडळ मोख्याचा पाडा गणेशोत्सव मंडळ मोख्या चापाडा,यांच्या सहकार्याने तसेच गावातील सर्व मोख्याचा पाडा महिला बचत गट , तरुण मुली ग्रामस्थ मोख्या चापाडा जा हनुमान भजनी मंडळ मोख्या चापाडा, गणेश मित्र मंडळ मोख्या चापाडा यांच्या सहकार्याने हे उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. महिलांना व ग्रामस्थांना आदर्श गाव संकल्पना, लोकसहभाग मधून गावचा विकास कसा करू शकतो, तसेच विविध आदर्श गावाची उदाहरणे दिली तसेच महिलांनी स्वतः पुढे येऊन शेती बरो गावातील सर्व महिला,युवक,बालगोपाळ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.