Type Here to Get Search Results !

माढा | ऊस उद्दिष्ट शंभर प्लस ग्रुपच्या माध्यमातून व सोमनाथ (तात्या )हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवर फेरी संपन्न



ऊस उद्दिष्ट शंभर प्लस ग्रुपच्या माध्यमातून ,तसेच सोमनाथ (तात्या )हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली ,आज. टेंभुर्णी ,शिराळ, सुरली ,अकोले खुर्द .या ठिकाणी ऊस व केळी पीक शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.




यावेळी या शिवार फेरीमध्ये या सर्व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यामध्ये प्रामुख्याने बेंबळे गावचे ,ऊस भूषण .श्री .सोमनाथ (तात्या )हुलगे, राजभाऊ कोळेकर, बंकट काळे .टेंभुर्णीचे एम. के देशमुख सर, महेश देशमुख, आबा देशमुख , राजभाऊ चव्हाण . शिराळ (टें)चे गणेश पवार, केशव तळेकर.




सुरलीचे सोमनाथ दादा सरडे,भागवत काळे .रघुनाथ दादा कदम, रोहित लोकरे .अकोले खुर्द. चे तात्यासाहेब पाटील, आर. एस पाटील ,अंगद पाटील, तसेच कन्हेरगावचे जयवंत डोके पाटील. इत्यादी ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




            आज गणपती व एकादशीच्या मुहूर्तावर शिवार फेरीची सुरुवात टेंभुर्णी येथून दुपारी एक च्या दरम्यान सुरू झाली . तसेच शिवार फेरीची सांगता सायंकाळी ठीक. ५. वाजता अकोले खुर्द येथील श्री आर .एस पाटील ,यांच्या ऊस प्लॉट वरती झाली.




          या शिवार फेरीमध्ये सर्व शेतकऱ्यांना श्री. सोमनाथ (तात्या) हुलगे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले .व तात्यांकडून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. शिवार फेरीमध्ये सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारे पुढील शिवार फेरीचे लवकरात लवकर नियोजन करण्यात येईल .सोमनाथ (तात्या )हुलगे यांचे आम्हा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्याबद्दल तात्यांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad