Type Here to Get Search Results !

चिमुकल्यांनी सजविले बालगणेशाचे रुप.आंबेगाव वसाहत



 यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.




यामध्ये इयत्ता ५ वी ते १० वी च्या २९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी जपत निसर्ग व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.




शालेय विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग व जलरंग वापरून बालगणेशाचे रुप सजविले. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी केले तसेच या प्रसंगी पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा या विषयी माहिती दिली.




रंगभरण स्पर्धेचे परीक्षण माणिक हुले,वैशाली काळे,संजय वळसे,वंदना मंडलिक ,वैभव गायकवाड, गौरी विसावे, राधिका शेटे ,निलम लोहकरे यांनी केले . कार्यशाळेचे नियोजन संतोष पिंगळे,गुलाब बांगर,सुभाष साबळे,लक्ष्मण फलके यांनी केले.




 बक्षीस पात्र विद्यार्थी लहान गट इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम रुद्र जयहिंद सोमवंशी,द्वितीय कुणाल गणेश कुंभार,तृतीय प्रिया रवींद्र सुर्यवंशी उत्तेजनार्थ स्वराज सचिन जगदाळे

मोठा गट इयत्ता ८ वी ते १० वी प्रथम तनुजा सुधाकर सोमवंशी.द्वितीय दुर्वांकुर नितीन जगदाळे व अथर्व अनिल जगदाळे.तृतीय ईश्वरी संतोष काळे, उत्तेजनार्थ अष्टमी रवींद्र पानमंद.


प्रतिनिधी - आकाश भालेराव

घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad