Type Here to Get Search Results !

कॉलेजचे विद्यार्थ्यांसाठी -सायबर अवेरनेस , सायबर क्राईम व सोशल मिडिया वापर बाबत मार्गदर्शन शिबिरा



कॉलेजचे विद्यार्थ्यांसाठी -सायबर अवेरनेस , सायबर क्राईम व सोशल मिडिया वापर बाबत मार्गदर्शन शिबिरा आयोजित केले बाबत.




  शनिवार दिनांक -09/09/2023 रोजी स.10.00 ते 12.00 असे दोन तास विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे करिता सायबर सुरक्षा दिंडी ,मंचर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आयोजीत करण्यात आले होते.




सदर सायबर सुरक्षा दिंडी कार्यक्रमात आण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे 500 विद्यार्थी , महात्मागांधी हायस्कुलचे -350 विद्यार्थी व शासकीय पॉलिटेक्निक महाविद्याल ,अवसरी खु.येथील 400 असे एकुण 1200 ते 1300 विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.




प्रस्ताविक व मार्गदर्शन - श्री.मितेश घट्टे -अपर पोलीस अधिक्षक सो.पुणे ग्रामीण यांनी केले त्यांनी सायबर क्राईम मध्ये गुन्ह्यांना प्रतिबंधा बरोबरच गुन्ह्यात आपण कसे अडकले जातो,तसेच ऑनलाईन गुन्हे करणारे गुन्हेगार यांच्या पद्धती या मध्ये साक्षर/माहिती खरून घेणे गरजेचे आहे.




सिद्धु मुसेवाला याचे हत्यामागे त्याचे काही धागेदोरे आंबेगाव तालुक्यात असुन त्यातील आरोपी यांचे बाबत सोशल मिडियावर अट्रॅक्शन जास्त असल्याचे दिसुन येते.छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्याला आदर्श असताना नवीन पिढी अट्रॅक्शन मुळे गुन्हेगारी कडे वळत आहे.सोशल मिडियावरील अफवा /बातमी याची खात्री करणे गरजेचे आहे.सोशल मिडियाचा वापर बेकायदेशीर,विनाषाकडे जाणारा नसावा तो विकासाकडे जाणारा असावा असे सांगितले.




मार्गदर्शन - पुर्वाताई दिलीप वळसेपाटील यांनी विद्यार्थी यांना संबोधित करताना सायबर सिक्युरीटी बाबत सध्या खुप गरजेचे आहे.सध्या सर्वच वर्गातील व्यक्ती सोशल मिडियाचा वापर करत असतात. घरातील मुले,वयस्कर लोक यांना टेक्नॉलॉजी मधील धोके व तोटे हे समजावुन सांगणे गरजेचे आहे.ऑनलाईन बँकेचे फ्रॉड त्या बाबत घ्यावयाची माहिती व दक्षता.




प्रमुख सायबर मार्गदर्शन - श्रीमती मुक्ता चैतन्य -(सायबर मैत्र/ GRY चॅरिटेबल फाऊंडेशन संस्थापक व अध्यक्ष ) यांचे विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन - सध्या भारतात मोबाईलचा वापराचा अतिरेक होत असुन जास्तीत जास्त मोबाईलचे वापरातुन अनावश्यक वेळ तरूण पिढीचा जात आहे.सोशल मिडिायवरील पोस्ट,फोटो,रिल त्यावरील लाईक यांचे अट्रॅक्शन,मोबाईल गेमिंग मध्ये अभ्यास सोडुन मोबाईल वर अनपेक्षित अडकला जातो,सोशलमेडियाचा वापर करताना त्याची माहिती पुर्ण पणे घेणे आवश्यक आहे.अनावश्यक प्रलोभन यांना बळी पडु नये.




ओटीपी कोणाला देवु नये,कोणत्याही लिंक क्लिक करू नये तसेच सध्याचे इंटरनेट आणि कॉम्प्युटर व ऑनलाईन बँकिंग,अँन्ड्रॉइड मोबाईलचे युगात ,इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या सहाय्याने असे कोणतेही काम अनोळखी व्यक्ती किंवा गटाद्वारे केले जाते ज्या मुळे दुस-या व्यक्तीची किंवा समुहाची आर्थिक ,शारीरीक किंवा मानसिक नुकसान व फसवणुक होते या पासुन सावध राहिले पाहिजे .अधिकृत ॲप्लिकेशनचा वापर करावा.




मार्गदर्शन -मा.दिलीप वळसेपाटील साहेब (मंत्री सहकार महा.राज्य)- कोणीही वाढदिवसानिमित्त प्रेझेंड दिलेला मोबाईल स्विकारू नका कारण त्या मध्ये बग असु शकते इतर धोकादायक ॲप असु शकतात.आर्टिफिशियल इंटिलिजन्स यातील धोके आपल्याला सांगता येणार नाही त्या बाबत सुरक्षा बाळगणे महत्वाचे आहे.आंबेगाव तालुक्यात सायबर सेल शक्यतो कोठे नसतो परंतु आपण सायबर विभागाची बिल्डिंग आपण मंजुर केली आहे त्यामुळे सायबर संदर्भात आपल्याला तक्रार द्यायला लांब कोठे जायची गरज नाही तुंम्ही विद्यार्थी अभ्यास करा,आंनंद मिळवा ,असे संशोधनात समजले आहे की,जे लोक खुप मोठ्या प्रमाणात मोबाईल व सोशल मिडियाचा वापर करतात पुढे जाऊन ते कॅन्सरचे पेशंट होतात.विधानसभा किंवा लोकसभेत कायदे बनवताना काही त्याच्यात समाविष्ठ करण्यासाठी काही इनपुट सुजाव असेल तर आपले प्राचार्यांकडे अथवा माझ्याकडे पाठवा त्याचा समावेश आपण नवीन कायद्यामध्ये करू.




सायबर सुरक्षा शपथ - पोसई धोत्रे - सायबर सेल,पुणे ग्रामीण यांनी सायबर सुरक्षा शपथ घेण्यात आली.




आभार प्रदर्शन - श्री.सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग यांनी विद्यार्थ्यांचे सायबर संदर्भातील प्रश्नांना उत्तरे दिली विद्यार्थी यांनी सायबर संदर्भातील अडचणी व त्यावरील घ्यवयाची दक्षता तसेच कायदेशीर प्रोसिजर या बाबत उत्तरे /माहिती दिली.




शेवट - कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला

प्रमुख उपस्थिती -

मा.दिलीप वळसेपाटील साहेब (मंत्री सहकार महा.राज्य)-

श्री.मितेश घट्टे -अपर पोलीस अधिक्षक सो.पुणे ग्रामीण

श्रीमती मुक्ता चैतन्य -(सायबर मैत्र/ GRY चॅरिटेबल फाऊंडेशन संस्थापक व अध्यक्ष )

श्री.सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग

श्री.बलवंत मांडगे -पोलीस निरीक्षक,मंचर पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी व कर्मचारी मंचर पोलीस स्टेशन

श्री.लहु थाटे - स.पो.नि.पारगाव पोलीस स्टेशन

श्री.नागटिळक - तहसिलदार आंबेगाव

सौ.प्रमिला वाळुंज - बी.डी.ओ.

श्री.गार्डी सर - प्रा.आण्णासाहेब आवटे कॉलेज 

आण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे 500 विद्यार्थी , महात्मागांधी हायस्कुलचे -350 विद्यार्थी व शासकीय पॉलिटेक्निक महाविद्याल ,अवसरी खु.येथील 400 असे एकुण 1200 ते 1300 विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक.


प्रतिनिधी - आकाश भालेराव

मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad