Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही


   डोंबिवली (भानुदास गायकवाड)


          रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि पशूवैद्यक व्यावसायिक कल्याणकारी संस्था यांच्या माध्यमातून दिनांक 09/09/23 ते 15/09/23 पर्यंत फिरस्ते कुत्रे/मांजरी यांच्यासाठी मोफत अँटीरेबीज लसीकरण मोहीम डोंबिवली परिसरात चालू असून त्याचा एक भाग म्हणून एमआयडीसी निवासी भागात मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचा सहकार्याने रविवार दिनांक 10/09/2023 रोजी सदर कार्यक्रम संपन्न झाला. एमआयडीसी निवासी, रेजन्सी इस्टेट/अनंतम, शंकेश्वरनगर या भागात जाऊन एकूण 227 फिरस्ते कुत्रे/मांजरी यांना अँटीरेबीज लस देण्यात आली आहे.




सदर मोहीम डॉ. मनोहर अकोले ( पशूवैद्यक ) यांच्या खास पुढाकाराने होत असून रविवारच्या या मोहिमेसाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष श्री प्रदीप बुडबाडकर आणि मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा महाडिक यांच्याबरोबर डॉ. संतोष साळवी ( पशूवैद्यक ), प्रसाद कांत, अरविंद टिकेकर, राजु नलावडे, संतोष शृंगारपुरे आणि मुंबई पशवैद्यक महाविद्यालयाचे एकूण 25 विद्यार्धी उपस्थित होते.  





         सदर मोहीम रोटरीक्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि पशूवैद्यक व्यावसायिक कल्याणकारी संस्था यांच्यातर्फे दिनांक 09/09/2023 पासून चालू करण्यात आली असून दररोज अंदाजे 200 अँटीरेबीज लसीकरण करण्याचा बेत आहे. दिनांक 30/09/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता डोंबिवलीचा श्री गणेश मंदिर सभागृहात जागतिक श्वान दंश जागृती दिनानिमित्त एक शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यापूर्वी त्याच दिवशी सकाळी श्री गणेश मंदिर येथून त्यानिमित्त एक रॅली काढण्यात येणार असून ती डोंबिवलीचा प्रमुख रस्त्यावरून फिरून तिचा समारोप श्री गणेश मंदिर पाशी होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. मनोहर अकोले यांच्या 9821040337/9967482467 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies