Type Here to Get Search Results !

रक्तदाता शिक्षक रोहित जाधव सरांनी तात्काळ एका गरीब मुलीला रक्त देऊन केली मदत



जव्हार : सुनिल जाबर


जव्हार तालुक्यातील पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तपेढी ही एकमेव पालघर जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढी असुन ग्रामीण भागातील रुग्णांना एक वरदान ठरत असुन आज जव्हार तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा वावर ही ग्रामपंचायत वावर वांगणी मधील अतिदुर्गम भागातील आश्रमशाळा असून त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कू. सुप्रिया दिपक खरपडे या रुग्णांला तिच्या शरीरात रक्त कमी असल्याने तिला पुढील उपचारा करिता AB+ पॉझिटिव्ह अत्यंत रक्ताची गरज असल्याची माहिती त्या शाळेतील  शिक्षक अंकुश कोल्हाळ सर यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पिठोले व सुनिल जाबर यांना सांगितले हे कळताच सोशल मीडिया चा वापर करून काही व्हाट्सप ग्रुप मधील रक्तदात्यांना आवाहन केले असता लगेच  सोशल मीडियाची माहिती मिळताच  शिक्षक रोहित जाधव सर जि. प. प्राथ.शाळा सारसून यांनी स्वतः रक्त पेढी येथे जाऊन एक पिशव्या रक्तदान करून सदर रुग्णांना मददत केली याबाबत त्याचे सामाजिक दायित्व बघून या दाणवीर शिक्षक रक्तदात्यांचे सर्वच स्तरातुन नातेवाईका मधून व तालुक्यातून अभिनंदन-कौतुकाचा वर्षाव केले जात आहे.




तालुक्यातील सोशल मीडिया द्वारे एका  मुलीला तात्काळ AB+ पॉझिटिव्ह नितांत रक्ताची गरज असल्याची माहिती समाजिक कार्यकर्ते यांच्याकडून समजतात मी माणुसकी हा माझा धर्म आणि मी स्वतः हा शिक्षक असून त्याठिकाणी आश्रम शाळेतील त्या विद्यार्थिनीला माझी विद्यार्थिनी नाही तर माझी मुलगी समजून त्या मुलीला रक्त दान केले असून माझं ते कर्तव्य आहे असं समजून मी हे रक्त दान केले. या गरजू विद्यार्थिनीला रक्तदान केले. याबद्दल जाधव सरांचे आश्रमशाळा वावर तर्फे खूप खूप आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad