नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथील बौध्द समाजातील अल्पवयीन मुलांना झाडाला उलटे टांगून जातीवादी गावगुंडाने बेदम मारहाण केली. त्या गावगुंडांवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करावे. व वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथील बुद्धविहाराची जागा नमुना ८ व सातबारावर नोंद घेण्यात यावी. या मागण्यासाठी वसमत उपविभागीय कार्यालया समोर बिरसा मुंडा चौक येथे भीम आर्मीच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. त्याप्रसंगी त्या आंदोलनाचं नेतृत्व भीम आर्मी जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केले यावेळी जिल्हा सचिव किसन खरे. जिल्हा संघटक कैलास कुंटे. बाबारावजी जाधव तालुका मार्गदर्शक नितीन जाधव, अमोल ठोके. जेवंत एगडे ,विनोद भुजबळ, अविनाश गायकवाड इत्यादी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी पोले वसमत