टाकरखेडा संभु ची ग्रामसभा गाजली, सरपंच , उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ यांनी महावितरण चे कनिष्ठ अभियंता यांना घरले धारेवर..
टाकरखेडा संभु इथली ग्रामसभा नेहमी वादात भोवऱ्यात अडकलेली असते असे आरोप नागरिक ग्रामपंचायत वर करत असतात .
31 तारखेला तहकूब ग्रामसभेच्या निमित्ताने गावामधे कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी उपस्थित होते
अशामधे सरपंच रश्मीताई देशमुख उपसरपंच प्रदीप शेंडे आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांनी गावामधे होत असलेल्या लोडशेडींग बद्दल कनिष्ठ अभियंता यांना जाब विचारले, अभियंता यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
सरपंच रश्मी देशमुख यांनी गावकऱ्यांच्या वतीने प्रश्नाची तोफ अभियंता यांच्यावर चालवली ...उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी अभियंता यांना कामाबद्दल चांगले धारेवर धरले .
तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या प्रश्नांचे उत्तर देताना अभियंता मात्र चांगले गोंधळून गेल्याचे दिसले.
91 इंडिया न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी वैभव भुजाडे, यांनी सुद्धा अभियंता यांना गावातील नागरिकांच्या तक्रारी घेऊन जाब विचारले टाकरखेडा शंभु मधील कनिष्ठ अभियंता वर दिलेल्या अर्जावर पोच न देणे , नागरिकांना उडवाउडवीची उत्तर देणे , काम करण्याची भूमिका संशस्पद असणे अशे अनेक प्रकारचे आरोप सभेमध्ये लावण्यात आले
यावेळेस सदस्य दिलीप म्हस्के , प्रीती पाटील, सोनाली जामठे आणि इतर सदस्य उपस्थित होते.
सभेच्या शेवटी सगळ्या तक्रारीचे निराकरण करण्याचे आश्वासन अभियंता यांनी दिले.