Type Here to Get Search Results !

डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन जवळील परिसरात वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर ऑनलाईन कारवाईला सुरुवात



 डोंबिवली (भानुदास गायकवाड)

                 दिनांक 0६/0७/२०२३ रोजीपासून डोंबिवली पश्चिम मच्छी मार्केट जवळील रेल्वे स्टेशन गेट समोर स्मार्ट सिटी अंतर्गत लवण्यात आलेल्या CCTV कॅमेरा व्दारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. दिनांक ०६/०७/२०२३ ते दिनांक ३१/०८/२०२८यादरम्यान डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात ३७२ कसुरदार वाहनचालकावर कारवाई करण्यात आली , कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

                    डोंबिवली वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोर पालन करावे. स्टेशन परिसर वाहतूक कोंडी मुक्त ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad