Type Here to Get Search Results !

करोळे | ग्रामपंचायत ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.



बुधवार दिनांक ९/८/२०२३ रोजी सकाळी ११:३० वा, करोळे ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामसभेमधील विषय व अध्यक्षांच्या परवानगीने विविध विषयावरती चर्चा करण्यात आली.सरकारकडून मंजूर झालेला निधी यामधून ग्रामपंचायत ने केलेली कामे व चालू कामे याविषयी चर्चा करण्यात आली व पुढील कामासाठी ठरावही घेण्यात आले.ग्रामस्थांकडून आलेल्या मागण्यावरही ग्रामसभेच्या अध्यक्षांच्या मंजुरीने ठराव घेण्यात आले.


यावेळी करोळे गावासाठी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजने अंतर्गत करोळे गावासाठी १ कोटी ६ लाख रुपयाची पाण्याची टाकी मंजुर आहे तो निधी करोळे कान्हापुरी रस्त्यासाठी वर्ग करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली व तो ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

करोळे कान्हापुरी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून जाताना शाळेतील मुलं व ग्रामस्थांना मोठ्या कसरतीने प्रवास करावा लागत आहे.

रस्ता खराब असल्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अनेक वेळा पावसाळ्यामध्ये रस्त्यावरून घसरून मुले व ग्रामस्थ पडून अपघात झाल्याच्या घटना ही घडल्या आहेत.




त्यामुळे हा निधी रस्त्याच्या कामाकडे वळवून रस्त्याचे काम करण्यात यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली.

यावेळी ग्रामसभेमध्ये शाळेची दुरुस्ती, वाड्या वस्तीवरील रस्ते, गटारे, संडास, रस्ते मुरमीकरण, बेबंळ रस्ते व इतर कामे यांनाही मंजुरी देण्यात आली.




कृषी सहाय्यक व्यवहारे साहेब यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेबद्दल माहिती देण्यात आली.

या ग्रामसभेला उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत संगणक चालक , शिपाई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad