Type Here to Get Search Results !

अकोला | न्याय मिळत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नितेश धांडे यांचे आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन



 ग्रा. पं. कार्यालय जऊळका (वरुर) येथील सन २०१५ ते २०२१ पर्यंत या कालावधीत १४ वा वित्त आयोग , सामान्य फंड, पाणी पुरवठा फंड, तंटामुक्ति फंड व जनसुविधा फंड व अंगणवाडी मध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करीता नितेश प्रमोद धांडे यांनी वेळोवेळी आपल्या कार्यालयाला अर्ज, स्मरणपत्र दिले परंतु त्यावर आपण कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. 




नितेश प्रमोद धांडे हे व्यथित होऊन आपल्या कडून न्याय मिळत नसल्यामुळे आपल्या कार्यालया समोर दिनांक. १४/०८/२०२३ रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे आपण जर आजपासून १४ तारखेच्या आत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तर न्याय मिळेपर्यंत आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण बसणार आहे असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना दिले.

प्रतिनिधी तुकाराम भोसले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad