Type Here to Get Search Results !

शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठानचा कंधार अभ्यास दौरा



लोहा प्रतिनिधी दि.६

शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या वतीने मराठवाड्यातील प्राचीन भूदुर्ग कंधार ,धर्मापुरी व किल्ले धारूर या किल्ल्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. यानिमित्ताने शिवदुर्गचे दहा मावळे या अभ्यास मोहिमेत सहभागी झाले होते. सर्वप्रथम या अभ्यास दौऱ्यात किल्ले कंधार या ठिकाणी भेट देण्यात आली व किल्ल्याची माहिती घेण्यात आली. तसेच या किल्ल्याचा प्राचीन इतिहास अभ्यासण्यात आला तसेच या किल्ल्याची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याची भावना शिवदुर्गचे समन्वयक श्री. वसंत सुरवसे यांनी व्यक्त केली त्याचबरोबर सर्व सदस्यांनी किल्ले कंधार या किल्ल्याचा सर्वांना अभ्यास करून किल्ला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली.




किल्ल्यात वाढलेली झाडे झाडोरा तोडून किल्ल्याचा श्वास मोकळा करणे आवश्यक असल्याचे मत अनेक सदस्यांनी मांडले खरंतर एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून कंधार शहराजवळ असणारा हा बलदंड भुईकोट किल्ला 1200 वर्ष दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देत उभा आहे या दृष्टीने त्याचे जतन होणे आवश्यक आहे .याबाबत सदस्यांनी पत्रकार शिवाजी मुंडे यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान अहमदनगर ही संस्था गडकिल्ले संवर्धनासाठी व गड किल्ले पर्यटनाच्या संदर्भाने काम करत असून लवकरच संस्थेच्या माध्यमातून कंधारच्या उर्जित अवस्थेसाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती श्री. सुभाष मानकर यांनी दिली या मोहिमेमध्ये शिवदुर्गचे भाऊसाहेब गवळी श्री.संजय साबळे श्री .परमेश्वर भवन श्री. संतोष आडसरे श्री .शंकर गरड श्री .प्रशांत हळगावकर श्री .ठाकूरदास परदेशी आदींनी सहभाग घेतला होता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad