राष्ट्रीय हायवेच्या कडेला असणाऱ्या ढाबे, हॉटेल्समध्ये हायवेवरून प्रवास करणारे, ट्रकचालक यांची जेवणासाठी वर्दळ असते. ढाबे, हॉटेल्समध्ये स्वादिष्ट जेवणासोबतच वेश्या व्यवसाय जोमात सुरू असल्याचे समोर आले. ग्राहकांना अधिकाधिक आपल्याकडे खेचण्यासाठी ढाबे, हॉटेलमालक तरूणींची सोय करत आहेत. युपीतील एनएच 19 वर भदोही येथे हॉटेलवर धाडीत पोलिसांनी नेपाळी, मिर्जापूर येथील तरूणींना ताब्यात घेतले. अवैध धंदे जोमात सुरू असल्याची चर्चा महाराष्ट्रातही अनेक हायवेंच्याकडेला नागरिकांमध्ये सुरू असते.