आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ मंचरच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त तीनशे वृक्षांचे वाटप विद्यार्थ्यांना करून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला .
विद्यार्थ्यांनी सकाळी तिरंगा रॅली काढून प्रभात फेरीत सहभाग घेतला. विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या स्वातंत्र्यदिन समारंभात एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती पात्र , मंथन शिष्यवृत्ती पात्र , सायन्स ऑलिम्पीयाड परीक्षेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेले , आयुका स्पर्धेत मॉडेल मेकिंग स्पर्धेत यश संपादन केलेले व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यांचा गुणगौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटच्या अधिव्याख्याता राजश्री तिटकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हिल क्लबचे अध्यक्षा डॉक्टर मेधा गाडे ,उपध्यक्षा स्वाती फदाले,डॉक्टर सुवर्णा काळे ,डॉक्टर शिवमाला धायबर, माजी सभापती प्रकाशराव घोलप, सरपंच प्रमिला घोलप, सदस्य- विजयराव घोलप , मिलिंद भांगरे , पूनम घोलप , मा . सरपंच निलेश राव घोलप ,उपसरपंच परविन पानसरे ,विस्तार अधिकारी मारुती शेंगाळे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अविनाश ठाकुर यांनी केले आभार प्रदर्शन श्री संजय वळसे यांनी केले . कार्यक्रमाचे नियोजन माणिक हुले, वैशाली काळे , वंदना मंडलिक, गौरी विसावे , वैभव गायकवाड ,श्रीमती शेटे ,संतोष पिंगळे ,गुलाब बांगर ,लक्ष्मण फलके , सुभाष साबळे यांनी पाहिले
प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव