Type Here to Get Search Results !

महागाव व बोखारे पांगरा या दोन्ही गावांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न.



 आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वसमत तालुक्यातील अंदाजे किमंत 596.25लक्ष एवढी असून N.H.757 ते पांगरा (बो) - पारवा - पळसगाव - पुयनी जवळा रोड रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मा. आ. राजु भैय्या नवघरे  यांच्या हस्ते संपन्न झाले.




यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब हे उपस्थित होते.

यावेळी गावातील जि. प. प्रा. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण - अंदाचे किंमत 15 लक्ष

स्मशान भूमी शेड व सुशोभीकरण- अंदाचे किंमत 15 लक्ष

हनुमान मंदिर समोरील शेड चे लोकार्पण, गावातील सी. सि. रोड चे लोकार्पण व गावातील विविध कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.




महागाव, आमदार राजुभैया नवघरे यांच्या माध्यमातून वसमत तालुक्यातील महागाव रस्त्यावरील उर्वरित जोड रस्त्याचे बांधकाम करणे. ग्रा. मा. 60 किमी 0/00 ते 4/00  अंदाजीत 349/- लक्ष एवढा निधी मंजूर झाला व आज या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन मा. आ. राजु भैय्या नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

अनेक कारणांनी या रस्त्याचा विकास होणे अत्यंत गरजेचे होते. या परिसराच्या विकासासाठी व शेतकरी,  नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्या सोडवण्यासाठी या रस्त्याचा विकास होणे आवश्यक होते. आज या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन होऊन लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.

या याप्रसंगी आमदार राजुभैया नवघरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व इतर राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांची व विकास कामांची माहिती दिली.

त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे, आमदार राजूभैय्या सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बाळूमामा ढोरे, अंबादास भोसले, उपसभापती सचिन भोसले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की आमदार राजु भैया नवघरे जीवापाड मेहनत करतो.


हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी पोले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad