Type Here to Get Search Results !

वाहतूक पोलीसांना येणारा मानसिक ताण तणाव आणि त्यावरील उपाययोजना यावर व्याख्यानाचे आयोजन



डोंबिवली(भानुदास गायकवाड). रस्त्यावर वाहतूक नियमन करताना पोलिसांना येणारा मानसिक ताण, नागरिकांशी सौजन्याने वागण्यासाठी स्वतःमध्ये संयम असणे कसे आवश्यक आहे याबाबत आज रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत शुभम हॉल, डोंबिवली पुर्व येथे रोटरी क्लब सनसिटी व डोंबिवली वाहतूक उप विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण वाहतूक विभागातील वाहतूक पोलिसांकरिता "वाहतूक पोलीसांना येणारा मानसिक ताण तणाव आणि त्यावरील उपाययोजना" या विषयावर प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ.श्री अद्वैत पाध्ये यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी 




            कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मंदार धर्माधिकारी, कल्याण वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरीश बने, डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते तसेच कल्याण, डोंबिवली व कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे अधिकारी, अंमलदार व वॉर्डन उपस्थित होते.


प्रतिनिधी / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad