Type Here to Get Search Results !

कल्याण मुरबाड रोड वरील पौर्णिमा चौक परिसर अनधिकृत पार्किंग च्या विळख्यात


 

कल्याण (भानुदास गायकवाड)

शहरात वाढत चाललेला पार्किंग चा प्रश्न ऐरणीवर आलेला सद्द्या आपण बगतो , शहरात सर्वत्र पार्किंगची समस्या भेडसावत असताना , कुठे तरी वाहतुकीला अडथळा करत अनधिकृत पार्किंग सर्वत्र केली जाते ,त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही , अशी अनेक उदाहरणे आपण बागितली असतील रस्त्यावर उभा केलेल्या वाहनांमुळे दुसऱ्या एणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ,तसेच पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना या गोष्टींचा नाहक त्रास होतो , काही वेळा निमुळत्या रस्त्यातून मार्ग काढते वेळी अपघात होणे , त्यामुळे भांडण तंटे होणे हे प्रकार आपण पाहतो .

          इतके असताना ही वाहतूक विभाग कुठे तरी कानाडोळा करताना किंवा कुटल्यातरी मोठ्या अपघाताची वाट बगतो आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे, मुरबाड रोडवरील मोठ्या हॉटेल्स , शोरुम, इथे येणारी वाहने सर्रास रस्त्यावर पार्क केली जात आहेत ,त्यावर वाहतूक विभाग डोळे बंद करून अपघाताची वाट बघत आहे, का मोठ मोठ्या हॉटेल्स किवा व शोरूम चे लागे बांधे तर नाहीत ना असा काहीसा प्रश्न नागरिक विचारात आहेत , संध्याकाळ व सकाळच्या वेळी येथील चौकात वाहनाच्या रांगा लागल्या जातात. वाहतूक विभाग यावर काही कारवाई करणार का ? हा आता पाहण्याचा विषय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad