Type Here to Get Search Results !

डोंबिवली पूर्व येथील स्मशानभूमीत मेल्यानंतर ही मरण यातना



डोंबिवली ( भानुदास गायकवाड )

           डोंबिवली पूर्व शिवमंदिर येथील स्मशानभूमीत आजूबाजूच्या परिसरातील तसेच डोंबिवलीतील बऱ्याच लांबून लांबून मृत व्यक्ती अंतिम विधी साठी आणल्या जातात , पण आज तेथील परिस्तिथी एवढी खराब झाली आहे की प्रशासन फक्त जिवंतपणी नाही तर मरणानंतर ही मरण यातना भोगायला लावत आहे असे काहीसे चित्र आज परिसरातील समाजसेवक जितेंद्र आमोणकर यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी ही बाब मीडियाच्या निदर्शनास आणून दिली .




         नागरिकांची येथे फारच गैरसोय होत असल्याचे तसेच स्मशानभूमी मध्ये पावसाचे पाणी वरून गळत असल्याने तसेच तेथे ठेवलेली लाकडे भिजत असल्याने बॉडी जाळण्यासाठी डिझेलचा फारच वापर करावा लागत असल्याचे दिसून आले, आज माणूस मेल्यानंतर पण त्यांचे हाल होत असल्याचे बघावे लागतात , स्मशानभूमीच्या बाजूच्या खांबावर असलेले घड्याळ पण बंद आहे.

एकाच वेळी अनेक बॉड्या ह्या स्मशानभूमी मध्ये येत असतात त्या बॉडी जाळण्यासाठी सुर्यवंशी नावाचा एकच माणूस आहे. त्या मुळे नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे, 

                    ज्या ठेकेदाराला या स्मशानभूमीची देखरेख व डागडुजी व व्यवसथापनाबाबत काम दिले आहे त्यांच्या कडून सर्रास दुर्लक्ष केले जात आहे , नक्की या ठेकेदाराच्या डोक्यावर कोणाचा हात आहे ज्या मुळे ही मरणयातना मेल्यावर ही लोकांना भोगायला लावत आहेत असा काहीसा सवाल नागरिक विचारात आहेत

तरी सदर ठिकाणी नागरिकांची असलेली गैरसोय पहाता सदरील स्मशानभूमी ची डागडुजी करून पाण्याची होत असलेली गळती थांबवून तेथे असलेल्या घड्याळाला नवसंजीवनी मिळावी. असे लोकांकडून सांगण्यात येत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad