सीमा हैदरने मोदींसह 'या' बड्या नेत्यांना पाठवली राखी
रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी हा दिवस अतिशय खास आहे. आता पाकिस्तानी सीमा हैदरही रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सरसंघचालक मोहन भागवत या दिग्गज नेत्यांना पोस्टाने राखी पाठवली आहे. सीमाने राखी पाठवून बहिणीच्या नात्याने आनंद व्यक्त केलाय.