शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता रामलीला मैदान हिंगोली येथे होणाऱ्या निर्धार सभेच्या पूर्वतयारीनिमित्त
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वारंगा फाटा, खरवड, वाकोडी, डोंगरकडा, जवळा पांचाळ, आखाडा बाळापूर, कळमनुरी, बाळापुर ,पोतरा, शेवाळा ,येळगाव तुकाराम, सिंदगी, नांदापूर,, पेडगाव, खेर्डा, बासंबा, कोथळज, पिंपळदरी, जलालदाभा, सिद्धेश्वर ,येळेगाव सोळंके, माथा या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख श्री बबनराव थोरात यांनी कॉर्नर सभा घेऊन सभेची जय्यत तयारी केली.
यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, उपनेते लक्ष्मणराव वडले, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,जिल्हा सहसंपर्क संघटक ॲड.रवी शिंदे, उपजिल्हाप्रमुख डिके दुर्गे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत देशमुख, उपजिल्हाप्रमुख जि. डि.मुळे काका, अजित मगर,
तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, अनंतराव जगताप, गणेश देशमुख ,संतोष सारडा, सभापती मारोतराव खांडेकर , बंडू पाटील, नंदकिशोर तोष्णीवाल, बाळासाहेब गावंडे ,पंढरीनाथ ढाले , मधुकर कुरुडे , यासह सर्कल प्रमुख, शाखाप्रमुख ,बूथ प्रमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.