Type Here to Get Search Results !

डोंबिवली | साध्या वेशातील कार्यसम्राट नगरसेवक



 डोंबिवली (भानुदास गायकवाड)

       नगरसेवक म्हंटले के आपल्या डोळ्यासमोर येते ती २ किंवा ३ गाड्यांच्या रांगेतील एका आलिशान गाडीतुन फिरणारी एक भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती ज्याच्या मागे पुढे बॉडीगार्डचा ताफा , 




        पण यातून अपवाद म्हणा असे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व बरेच दिवसांपासून कार्यरत आहे ,त्यांचं नाव आहे मा. श्री विनोद जयराम काळण डोंबिवली पूर्व येथील वॉर्ड क्र. ८४ चे भाजपा चे कार्यशील नगरसेवक , एकदम सादे राहणीमान ,उच्च विचारसरणी .

         



आज या विभागातील ,पाण्याचा प्रश्न भेडसावत असो की , सांडपाण्याचा निचरा नीट होत नसेल , रस्ते असो की वयक्तिक काही प्रश्न विनोद साहेब हे स्वतः जातीने लक्ष घालून ती कामे समोर उभा राहून करून घेतात , एखाद्या सोसायटी मध्ये ब्लॉक लावून देणे असो , गावातील रस्त्या साठी लाखोंचा निधी उपलब्ध करून देऊन रस्त्याची समस्या सोडवण्यापासून ,पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असताना विभागात पिण्याच्या पाण्याच्या टाकी साठी निधी उपलब्ध करून देणं, असे अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आज त्यांची एक वेगळी ओळख या विभागात झाली आहे ,म्हणून या विभागाचे लाडके नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आज निर्माण झाली आहे ,




विभागातील सर्व नागरिकांना कडून भरभरून प्रेम आज त्यांना मिळत आहे, अशीच कामे त्यांच्या हातून होत राहो व त्यांची कारकीर्द अशीच चालत राहो अशी नागरिकास. कडून बोले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad