Type Here to Get Search Results !

वसमत तालुक्यातील पळशी येथील गावकऱ्यांचे महावितरण उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन



 पळशी येथील 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत कृषी डीपी वरून रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करावा यासाठी पळशी येथील गावकऱ्यांच्या वतीने उप कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग वसमत यांना निवेदन देण्यात आले.कृषी पंपासाठी विविध डीपी वरून वीज जोडन्या आहेत विज उपलब्धतेनुसार कंपनीकडून परिसरात भारनियमन आहे त्यामुळे कधी दिवसाला तर कधी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होतो परंतु रात्रीच्या वेळी वीज पुरवठा ज्यावेळी बंद असतो त्यावेळी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होते. कारण अंधाराचा फायदा घेत आखाड्यावर छोट्या-मोठ्या चोरीचे प्रमाण देखील वाढत आहे तसेच बरेच कुटुंब हे शेतात राहत असल्यामुळे लाईट नसल्याने मुलांच्या अभ्यासावर देखील त्याचा परिणाम होत आहे.सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले यावेळी. बापूराव गरड शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, अर्जुन दत्तराव बेंडे तालुका महासचिव भाजपा, वशिष्ठ बेंडे, प्रल्हाद बेंडे, मारुती बेंडे विश्वनाथ भंडारे हनुमान डांगरे,धोंडीराम डांगरे भगीरथराव बेंडे, सिताराम बेंडे व आदींची उपस्थिती होती.




 हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी पोले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies