Type Here to Get Search Results !

माढा आ.बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेगाव खुर्द येथे रक्तदान शिबिराचे आयोजन



माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री बबन दादा शिंदे यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त आलेगाव खुर्द येथे रक्तदान शिबिराचे आयोजन




आलेगाव खुर्द चे माजी सरपंच प्रदीप गायकवाड यांनी स्वतः व त्यांच्या दोन्ही मुलींनी दादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले व समाजामध्ये एक संदेश दिला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनी रक्तदान करावे असे आवाहन केले .




यावेळी आलेगाव खुर्द येथील माढेश्वरी पथ संस्थेचे संचालक राजुआन्ना पाटील सरपंच अमोल देवकाते उपसरपंच उद्धव केचे दत्ता माने ग्रामपंचायत सदस्य तसेच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे केन मॅनेजर संभाजी थिटे ॲग्री ओव्हरसीअर नितीन मरगर व त्यांचा स्टाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad