Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद शाळा कोलतावडे येथे सोनाली सचिन पालेकर यांची बदली



आज जिल्हा परिषद शाळा कोलतावडे येथे सोनाली सचिन पालेकर यांची बदली चांडोली येथे झाल्याने यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्याचप्रमाणे माता बाल संगोपन केंद्र मुंबई यांच्यामार्फत मिळालेल्या सौर ऊर्जा व ई लर्निंग संचाचे उद्घाटन विस्तार अधिकारी शत्रुघ्न जाधव व केंद्र प्रमुख लहू घोडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पालेकर मॅडम यांनी कोलतवडे शाळेत पाच वर्ष अगदी नियमात सेवा केली.




महिलांसाठी अवघड अशा डोंगराळ भागात कधी पाई चालत तर कधी स्कुटीने तर दरड कोसळल्यावरती पायी पायी असा प्रवास करून नित्य नियमाने मुलांना शिक्षण देण्याचे कार्य केले.




शाळेतील मुलांना स्कूल बॅग,स्पोर्ट शूज, स्पोर्ट ड्रेस इत्यादी वस्तू स्वखर्चाने दरवर्षी घेऊन देत होत्या. यशवंतराव कला क्रीडा स्पर्धेत सतत तालुकास्तरापर्यंत दरवर्षी बाजी मारली. असे शिक्षक आमच्या ग्रामीण भागात मिळाले हे आमचे भाग्य असे मत सरपंच गोविंद शेळके व रमेश शेळके यांनी व्यक्त केले. यानिमित्ताने सचिन पालेकर यांनी मुलांना रेनकोट व वॉटर बॉटल चे वाटप केले. तसेच सटवायच्या देवळात व शाळेला वॉल क्लॉक भेट दिले. आईच्या मायेने ज्ञानदानाचे कार्य त्यांनी केले असे मत कपिल कांबळे यांनी व्यक्त केले.




शाळेला आत्तापर्यंत वाचनालयासाठी कपाट, ऑफिस टेबल, खुर्च्या, बोलका व्हरांडा, वर्ग उपक्रमाचे साहित्य ठेवण्यासाठी मांडण्या ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी मिळवून दिले होते. या कार्यक्रमासाठी सखाराम शेळके, उत्तम शेळके,रतन शेळके,महादेव किर्वे, किर्वे पुजारी ग्रामसेवक दिनेश नांगरे,सिंधुताई किर्वे, उपसरपंच सीता किर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.




शेवटी सचिन पालेकर आणि सोनाली पालेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार किरण वळसे यांनी मांनले.


प्रतिनिधी - आकाश भालेराव

कोलतावडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad