Type Here to Get Search Results !

प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न



प्रतिनिधी

 धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमातील शिक्षण देणाऱ्या योजनेची संलग्न असलेल्या सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील गैरसोयीचे निवारण करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 

सेलू तालुक्यातील प्रिस इंग्लिश स्कूलमध्ये धनगर समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाकडून या विद्यार्थ्यांना शिकवण्यापोटी व निवास भोजन व्यवस्थेसाठी प्रति विद्यार्थी 70 हजार रुपये या शाळेला देण्यात येतात. पण या शाळेकडून मिळणाऱ्या सुविधा बद्दल विद्यार्थी व पालक समाधानी नव्हते. यासंदर्भात 15 ऑगस्ट रोजी भाऊराव डुकरे आणि नाथाभाउ रोडे या पालकांनी उपोषणही केले होते. या उपोषणादरम्यान समाजाचा प्रतिनिधी म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी उपोषण करणाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. समाज कल्याण आयुक्त यांचीही भेट घालून दिली होती. पण तोडगा निघाला नव्हता.आज बुधवारी या संदर्भात जिल्हाधिकारी गावंडे साहेब यांच्या दालनात त्यांच्या उपस्थितीमध्ये समाज कल्याण आयुक्त गुट्टे यांनी उपोषण करते विद्यार्थ्यांचे पालक, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे संचालक, प्राचार्य, धनगर समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घडवून आणली. या बैठकीत समाजाचे प्रतिनिधी म्हणून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडून पालकांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. येत्या पंधरा दिवसात पालकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गावडे यांनी प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रशासनास दिले. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर,भाऊराव डुकरे, नाथा रोडे पालक प्रतिनिधी, ज्ञानोबा ताठे मराठवाडा उपाध्यक्ष रासप, बाबासाहेब दुगाणे जिल्हाध्यक्ष रासप, सुनीलभाऊ पितळे, पाथरी तालुका अध्यक्ष धनगर संघर्ष समिती आदीसह शाळा प्रतिनिधी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad