Type Here to Get Search Results !

"मेरी माटी मेरा देश"या उपक्रमाअंतर्गत कल्याण वाहतूक विभागाच्या वतीने "मातीला नमन, विरांना वंदन" या कार्यक्रमाचे आयोजन



"मेरी माटी मेरा देश"या उपक्रमाअंतर्गत कल्याण वाहतूक विभागाच्या वतीने शहिद कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक, घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे "मातीला नमन, विरांना वंदन" या कार्यक्रमाचे आयोजन




   आज दिनांक 23/08/2023 रोजी " *मेरी माटी मेरा देश"* या उपक्रमाअंतर्गत कल्याण वाहतूक विभागाच्या वतीने शहिद कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक, घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे "मातीला नमन, विरांना वंदन" या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहिद सैनिक कुटुंबीय, सेवानिृत्त सैनिक व पोलीस यांचा सन्मान करण्यात आला. कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे वपोनि श्री रवींद्र क्षीरसागरयांनी उपस्थित अधिकारी व मान्यवरयांचे स्वागत केले.




        यामध्ये शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांचे आई वडील श्री व सौ सुधा राजा सचाण, 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अरूण चित्ते यांची मुलगी खुशी चित्ते, सेवानिवृत्त ब्रिगेडियर आनंद ठाकूर, पद्मश्री गजानन माने, स्क्वाड्रन लीडर नीतू थापलीयाल, मेजर. श्री शलिल शिंदे, मेजर श्री. विनय दगावकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील काळे, सपोनि श्री अर्दालकर, रिटायर्ड सैन्यातील हवालदार श्री बाजीराव पाटील, यांचा कल्याण वाहतूक विभागाच्या वतीने शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.




     यावेळी बोलताना श्री मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग यांनी देशासाठी शहीद होणारे वीर, त्यांचे कुटुंबीय, सेवानिवृत्त सैनिक, सेवानिृत्त पोलीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक देशवासीयाने आपल्या देशाची सेवा करणाऱ्या या सैनिकांप्रती अभिमान बाळगला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच उपस्थित मान्यवर रिटायर्ड ब्रिगेडियर माननीय श्री आनंद ठाकूर सर यांनी डोंबिवली मधील तरुणांनी देखील सैन्यात सामील होऊन देशसेवा करावी असा मनोदय व्यक्त केला. पद्मश्री माननीय गजानन माने सर यांनी देखील विद्यार्थ्यांना उद्देशून तरुणांची देशाप्रति असणारी भावना अशीच प्रज्वलित राहावी यासाठी आशा उपक्रमास प्राधान्य द्यावे या भावना व्यक्त करून आभार मानले.




    ओमकार स्कूल व सेंट जॉन स्कूल,डोंबिवली पुर्व येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ बँड वादन करीत शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी श्री सुनील कुराडे, ACP डोंबिवली, श्री नितीन गिते, Sr.PI डोंबिवली पोलीस स्टेशन, श्री दत्तात्रय बोराटे,Sr.PI टिळकनगर, श्री मोहन खंदारे,Sr.PI विष्णूनगर हजर होते.




   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शिरीष देशपांडे, शशांक देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक उप विभाग यांनी केले.




कार्यक्रमाची सांगता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र क्षीरसागर कोळशेवाडी वाहतूक उपविभाग यांनी पंचप्रण शपथ व राष्ट्रगीताने केली.




 प्रतिनिधी ( भानुदास गायकवाड)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad