आझादी अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा उपक्रम हा सध्या पूर्ण भारतभर साजरा होत असून दिनांक १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस शासनामार्फत प्रत्येक शाळेमध्ये ,गावामध्ये राबविण्यासाठी आव्हान केले आहे त्यामुळे आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात आणि सानिध्याच्या कुशीत वसलेली रयत शिक्षण संस्थेची प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा वावर येथे सकाळी ७.४५ वा शाळेचे मुख्याध्यापक श्री गारुडकर सरांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकिवण्यात आला.
या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून आझादि अमृत महोत्सव उपक्रम हर घर तिरंगा या बाबत गावांतील नागरिकांना व विद्यार्थ्यांना माहिती देवून जनजागृती करण्यात आली .
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गारूडकर सर , अधिक्षक निकवाडे सर लेखनिक महाले सर व पवार सर ,कोरडे दादा , भुजाडे तसेच गायकवाड व बेंडकोळी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, व शाळेतील विद्यार्थि व इतर मान्यवर उपस्थित होते.